अचलेर : जय गायकवाड
धनगर समाज सेवा संस्थेच्या उस्मानाबाद जिल्हाध्यक्षपदी लोहारा तालुक्यातील अचलेर येथील सामाजिक कार्यकर्ते सिद्धू चंद्रकांत गोपने यांची बुधवार दि. ११ नोव्हेंबर रोजी औरंगाबाद येथे मराठवाडा विभागाचे अध्यक्ष दत्तात्रय म्हेत्रे यांच्या शुभहस्ते निवडीचे पत्र देऊन निवड करण्यात आली.
यावेळी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे लोहारा तालुका अध्यक्ष प्रदिप पुजारी, पत्रकार अनिल कासार, सुनील पाटील आदी उपस्थित होते. या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.