तुळजापूर, दि. 12 : शहरातील कने गल्ली, भोसले गल्ली, परमेश्वर वाडा, अमृतराव गल्ली, रोचकरी गल्ली या ठिकाणी गरजूंना गणेश देवानंद रोचकरी यांच्यावतीने 750 किराणा किट वाटप करण्यात आले.
यावेळी पाच गरीब घरातील सुवासिनी महिलांच्या हस्ते किट पिशवीची पूजा करून किट वाटप करण्यास सुरुवात करण्यात आली. यावेळी गणेश रोचकरी, विजय भोसले, किरण अमृतराव, अलोक शिंदे, नानासाहेब पेंदे, प्रमोद चव्हाण, बलदेवसिंग चव्हाण, आकाश वटणे, रितेश आडेकर, संजय कवडे, अमित कणे, नागनाथ सावंत, सिवांनाद कपाळे, मंगेश घाडगे, लखन भोसले, अनिकेत पुजारी, दिपक सूर्यवंशी आदी उपस्थित होते.