पुणे, दि. 12 : स्वाती बाबुराव चव्हाण हिने ट्रिनिटी अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग कॉलेज, पुणे मधून सलग चौथ्या वर्षी सिव्हील इंजिनिरिंग क्षेत्रातून प्रथम क्रमांक मिळवले आहे. तिच्या या यशाबद्दल राष्ट्रीय बंजारा विकास मिशन महाराष्ट्र प्रदेश कमिटी तर्फे स्वाती बाबुराव चव्हाण हिचा सत्कार करुण शुभेच्छा देण्यात आल्या.