लोहारा, दि. 04 : प्राची धनंजय झोंबाडे, रा. उस्मानाबाद यांनी माहेरहुन पैसे आणावेत असा तगादा सासरकडील 1)धनंजय मोहन झोंबाडे (पती) 2)गोजरबाई (सासु) 3)बालाजी (दिर) 4)नानासाहेब (दिर) 5)पुष्पा (जाऊ), सर्व रा. याशवंतनगर, सांजा 6)वैशाली आडसुळ (नणंद) 7)सुभाष आडसुळ (नंदावा) यांनी लावला होता. त्यासाठी त्यांनी संगणमताने प्राची यांचा सन- 2018 पासुन सासरी यशवंतनगर, सांजा येथे वेळोवेळी शारिरीक- मानसिक छळ केला. अशा मजकुराच्या प्राची झोंबाडे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद आरोपींविरुध्द भा.दं.सं. कलम- 498 (अ), 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा दि. 03.11.2020 रोजी नोंदवला आहे.

 
Top