उमरगा, दि. 04 : श्रीमती- नसरीन शौकत पटेल, रा. उमरगा या सतत आजारी पडत होत्या. यावर एका अनोळखी मांत्रीकाने त्यांना “जुन्या बंद घरातील खोलीत खड्डा खोदुन त्यात नारळ, लिंबु पुजा करुन टाका त्यामुळे तुमचा आजार नाहीसा होईल.” असे सांगीतले. त्यावर आरबाज शौकत पटेल, नसरिन शौकत पटेल, दोघे रा. उमरगा, तैसिन पाशामियॉ मुल्ला, रा. नाईचाकुर यांनी त्या मांत्रीकाच्या सल्ल्याप्रमाणे दि. 24.10.2020 रोजी मध्यरात्री नाईचाकुर येथील महेबुब मुल्ला यांच्या जुन्या घरात खड्डा खोदुन पुजा केली.
अशा मजकुराच्या पोलीस पाटील- बाळु स्वामी यांनी दि. 03.11.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद तीघांसह अज्ञात मांत्रीकाविरुध्द ‘महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमाणुष, अनिष्ठ व अघोरी प्रथा, जादुटोना प्रतिबंधक कायदा कलम- 3 (2), 3 (3) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.