आंबी, दि. 27 : अमोल शहाजी पाटील, रा. ईनगोंदा, ता. परंडा यांचे ईनगोंदा गट क्र. 199 मध्ये खडी क्रशर केंद्र आहे. दि. 22.10.2020 रोजी 10.30 वा. सु. गावकरी- 1)हरीदास औसारे 2)नागनाथ औसारे 3)लक्ष्मण औसारे 4)नामदेव औसारे 5)वसंत औसारे 6)ईश्वर औसारे 7)बाबुराव औसारे यांनी त्या खडी केंद्रात घुसून, “तु खडी क्रशर कसा चालू करतोस तुला ते चालवायचे असेल तर तु आम्हाला 5 लाख रुपये दे.” असे अमोल पाटील यांना धमकावले.
तसेच अमोल यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, मारहाण करुन ठार मारण्याची धमकी दिली व खडी क्रशर यंत्राच्या विद्युत मोटार- साहित्यांची मोडतोड करुन नुकसान केले. अशा मजकुराच्या अमोल पाटील यांनी दि. 26.11.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 384, 427, 447, 323, 383, 504, 506, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.