उस्मानाबाद, दि. 27 : कल्पना राहुल सोनवणे, रा. पापनाश नगर, उस्मानाबाद यांच्या राहत्या घराचा दरवाजा पावसाने फुगल्याने व्यवस्थीत बंद होत नव्हता. त्याचा फायदा घेउन अज्ञात चोरट्याने दि. 17.09.2020 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास कपाटातील 25 ग्रॅम सोन्या- चांदीचे दागिने व वस्तु, रोख रक्कम 3,000/-रु. व रेडमी व आयटेल असे दोन मोबाईल फोन असा एकुण 1,28,000/-रु. चा माल चोरला होता. यावरुन उस्मानाबाद (श.) पो.ठा. येथे गु.र.क्र. 322 / 2020 नुसार दाखल होता.

सदर गुन्हा तपासात स्थागुशा च्या पथकाने यापुर्वीच आरोपींना अटक करुन त्यांच्या ताब्यातील नमूद मुद्देमाल जप्त केला होता. मा. न्यायालयाने तो मुद्देमाल मुळ मालकास परत करण्याचा आदेश दिल्याने तो माल काल दि. 26.11.2020 रोजी शहर पो.ठा. येथे पोनि- श्री बुधवंत यांच्या हस्ते श्रीमती- कल्पना सोनवणे यांना हस्तांतरीत करण्यात आला. नमूद माल  परत मिळाल्याने श्रीमती सोनवणे भारावून गेल्या व त्यांनी पोलीसांचे आभार व्यक्त केले. 

 
Top