चिवरी : राजगुरु साखरे
तुळजापूर तालुक्यात मागील काही दिवसापासून थंडी वाढली आहे. त्यामुळे गावागावात शेकोट्या पेटवून थंडीपासून बचाव करताना नागरिक दिसत आहेत. थंड हवामानामुळे सायंकाळी सहा वाजल्यानंतर चांगलीच हुडहुडी भरली जात आहे. बोचर्या थंडीपासून संरक्षण करण्यासाठी स्वेटर, जॅकेट, जर्किन वापरू लागले आहेत. तर कित्येक ठिकाणी शेकोट्या पेटू लागली आहेत. गेल्या आठवड्यापासून तालुक्यात गुलाबी थंडीची चाहूल लागली आहे. दिवसेंदिवस थंडीचा कडाका वाढत जात आहे.
ऐन दिवाळीच्या तोंडावर तापमानाचा पारा घसरू लागला आहे. दिवसभरात हवेत गारवा आहे. सायंकाळी सहा वाजल्यानंतर रात्री कडाक्याची थंडी हुडहुडी आणणारी पडत आहे. हवेत गारवा निर्माण झाला आहे. सकाळच्या प्रमाणात दवही मोठ्या प्रमाणात आता पडू लागले आहे. हवेतील गारठ्यामुळे शहरासह ग्रामीण भागातील सायंकाळी रस्तेही सामसूम होऊ लागले आहेत. गत वर्षी दिवाळीनंतर पावसाने धुमाकूळ घातल्याने थंडीची वाट पहावी लागली होती.
यंदा मात्र नोव्हेंबर सुरू होताच गुलाबी थंडीचे आगमन झाल्याचे चित्र दिसत आहे. पावसाळा संपल्याने छत्री, रेनकोट कपाटात जाण्याआधीच थंडीची चाहूल लागल्याने उबदार कपड्यांच्या घड्या कपाटा बाहेर डोकावू लागले आहेत. तसेच यंदा कोरणा-या महाभयंकर महामारी च्या पार्श्वभूमीवर अनेक जण शहरी भागातून गावाकडे परतली आहेत. शहरी भागातून आलेल्या अनेक नागरिकांची पावले आता या ऋतूत फिटनेसाठी सकाळी मॉर्निंग वॉकसाठी वळू लागले असल्याचे चित्र दिसत आहे.