मंगरूळ, दि. 13 : वात्सल्य सामाजिक संस्थेच्या माध्यमातून वसुबारस दिवसाचे औचित्य साधून मंगरूळ ता. तुळजापूर येथे गोशाळा प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले.

33 प्रकारचे वैज्ञानिक महत्त्व असणाऱ्या गाईला भारतीय संस्कृतीमध्ये अनन्य साधारण महत्त्व आहे. गोधन हा शेतकऱ्यांचा अत्यंत जवळचा मित्र आहे पण शासनाच्या उदासीनतेमुळे व समाजाच्या दुर्लक्षामुळे गाईंची संख्या कमालीची कमी होत आहे हाच विचार करून वात्सल्य सामाजिक संस्थेने गोमाते साठी सुसज्ज गोशाळा बांधून शेतकरी बांधवांच्या उपयोगी येणारी अनेक प्रकारचे उत्पादने निर्माण करण्याचा संकल्प केला आहे.संस्थेने यापूर्वीही रामतीर्थ,नळदुर्ग येथे 2018 च्या दुष्काळात 300 गाईंचा सांभाळ केला होता.

ऋषीकेश येथील आश्रमाचे महंत योगी अरविंद, तुळजापूर येथील गरीबनाथ मठाचे महंत मावजीनाथ महाराज, फुलाजी ताटीकुंडलवार यांच्या शुभहस्ते गोमातेची पूजा करून जागेचे भूमीपूजन झाले. सदरील कार्यक्रमासाठी उमाकांत मिटकर, संस्थेच्या उपाध्यक्षा प्रमिला जाधव, प्रवीण म्हमाने, कौशल्या यमगर, रवी कुलकर्णी, विनोद दुपारगुडे, सागर राठोड, बारीकराव वाघमोडे, लक्ष्मण दुपारगुडे यांच्यासह गोसेवकांची उपस्थिती होती.

 
Top