जळकोट : मेघराज किलजे
तुळजापूर तालुक्यातील जळकोट व परिसरातील सर्व बहिणीसाठी माझे घर हे माहेर असून, कुठल्याही संकटसमयी मदतीसाठी माझे दार हे सदैव खुले आहेत. अशी भावनिक साद जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व तुळजापूर तालुका भाजपा नेते गणेशराव सोनटक्के यांनी दिवाळीच्या पाडव्यादिवशी व भाऊबीजेची ओवाळणी घालताना दीड हजार बहिणींना घातली.
गेल्या वीस वर्षापासून गणेश सोनटक्के व मित्र परिवाराच्या वतीने दरवर्षी दिवाळीला जळकोट व परिसरातील भाऊबीजेची बहिणींना ओवाळणी घातली जाते. हा उपक्रम अखंडित सुरू आहे. यावर्षी सोनटक्के यांच्या आलियाबाद रोडवरील निवासस्थानी पाडवा व भाऊबीज हजारो महिला व पुरुष यांच्यासोबत सोनटक्के व मित्रपरिवार यांच्यातर्फे दिवाळी साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमात ग्रामीण भागातील उपजत कलागुणांना वाव देण्यात आला. अस्सल गावरानी कार्यक्रम यावेळी सादर झाले. यात जळकोट येथील कवी बालाजी पालमपल्ले, सुरज अंगुले यांनी उत्कृष्ट कवितेचे सादरीकरण करून रसिकांची मने जिंकली. तर मानमोडी येथील कवी अजय थोरात यांनी कविता सादर केल्या. हगलुर येथील अनिता घुगे यांनी आराधी गीते सादर केली.मुर्टा येथील कु. स्वाती लोहार यांनी विविध भक्तीगीत सादर करून कार्यक्रमात बहार आणली. वागदरी येथील शामल शिंदे या महिलेने शिवाजी महाराजांवर पोवाडा सादर करून रसिकांच्या मनावर शहारे आणली. तर इलाही गडीवाले यांनी चिट्ठी आई है हे हिंदी गीत सादर केले. तर जळकोट येथील बालाजी साळुंखे या नवयुवकाने संबळ वाद्य सादर केले.
या कार्यक्रमात राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त जळकोट व परिसरातील पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. दिवाळीनिमित्त गणेश सोनटक्के व मित्र परिवाराच्या वतीने जळकोट व परिसरातील विविध गावातील १५५१ बहिणींना भाऊ बीजे निमित्त साडी भेट देऊन ओवाळणी टाकण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक बबन मोरे यांनी केले.
शुभेच्छा देताना श्री गणेश कृषी विज्ञान मंडळ कृषी वाचनालय या संस्थेचे अध्यक्ष तथा पत्रकार मेघराज किलजे म्हणाले की, गेल्या वीस वर्षापासून सुरू असलेला उपक्रम अखंडितपणे सुरू आहे. राजकारण करणे सोपे आहे. परंतु सेवाव्रत जोपासणे अवघड आहे. हे हे व्रत पुढेही सुरू राहण्यासाठी हजारो बहिणींचा आशीर्वाद सोनटक्के यांच्या पाठीशी आहे. हजारो बहिणींना घेऊन निघालेले हे सुपरफास्ट ट्रेनचे रूपांतर मोठा जंक्शन मध्ये होण्यासाठी सोनटक्के यांच्या पाठीशी आशीर्वाद आहे. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील यांनी सांगितले की, गणेश सोनटक्के व राणाजगजितसिंह पाटील विकासाचे हे मोठे रत्न आहेत. सेवाभाव जपून सोनटक्के गेल्या वीस वर्षापासून सर्वसामान्यांमध्ये दिवाळी साजरी करतात. हे मोठे काम आहे.
आमदार राणाजगजितसिंह सिंह पाटील यांच्या शुभेच्छा सोनटक्के यांच्या पाठीशी आहेत. गणेश राव सोनटक्के यांनी भावनिक साद घालताना म्हणाले की, राजकारणापेक्षा मी समाजसेवा करतो त्याच्या पाठीमागे तुमचे आशीर्वाद आहेत. हा आशीर्वाद कायम पाठीशी राहू द्या.
या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष नेताजी पाटील, उस्मानाबाद पंचायत समितीचे माजी सभापती बालाजी गावडे, होर्टीचे महादेव पाटील, नांदुरीचे नालंदा पाटील, जळकोट सोसायटीचे माजी चेअरमन रमेश सोनटक्के, केदारलिंग देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बाबुराव पटणे, माजी जिल्हा परिषद सदस्य सौ. सविताताई सोनटक्के, युवा नेते ऍड. आशिष सोनटक्के, सौ. अवंतिका सोनटक्के, आकाश सोनटक्के, नसीर इनामदार, हनुमंत सुरवसे, अनिल छत्रे, अनिल बेडगे, इरांना स्वने, नागनाथ किलजे, भालचंद्र पोतदार, बाळासाहेब पाटील, सतीश माळी ,संतोष वाघमारे दामू लोखंडे , पत्रकार आदीसह महिला, बहिणी, नागरिक, ग्रामस्थ, युवक, कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचालन सतीश माळी, बबन मोरे, मेघराज किलजे व अरुण लोखंडे यांनी केले. आभार संजय रेणुके यांनी मानले.