उस्मानाबाद, दि. 19 : कॉमन सर्विस सेंटरद्वारे (सीएससी) पुरवल्या जाणाऱ्या सेवांची यादी ऑनलाईन उपल्ब्ध करून देण्यात आली आहे.या सेवा, उस्मानाबाद डाक विभाग, मुख्यालय, लातूर अंतर्गत येणाऱ्या डाक कार्यालयाद्वारे पुरविण्यात येत आहेत. कॉमन सर्विस सेंटरद्वारे पुरवल्या जाणाऱ्या सेवांची यादी https://csc.gov.in/या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.
डाक कार्यालयाचे नावे पुढीलप्रमाणे आहेत.
1.लातूर मुख्य डाकघर.2.निलंगा उप डाकघर.3.टिळकनगर उप डाकघर.4.उदगीर उप डाकघर.5.अहमेदपूर उप डाकघर.6.तुळजापूर उप डाकघर.7.भूम उप डाकघर.8.उमरगा उप डाकघर.तरी नागरिकांनी या सुविधांचा लाभ घ्यावा,असे आवाहन डाकघर आधीक्षक,उस्मानाबाद विभाग,मुख्यालय,लातूर यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.