चिवरी : राजगुरु साखरे 

तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील श्रीक्षेत्र महालक्ष्मी मंदिर भाविकांसाठी सोमवारपासून खुले झाल्याने भाविकांसह ग्रामस्थ व्यापारी वर्गामध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.

गेल्या आठ महिन्यापासून महालक्ष्मी मंदिर परिसरातील हार फुले, नारळाची दुकाने, खेळणी चे दुकाने, हॉटेल पूर्णपणे बंद होती. त्यामुळे महालक्ष्मी परिसर सुनासुना दिसत होता. आता पूर्वीसारखाच गजबजून दिसत आहे, सोमवारपासून मंदिर खुले झाल्याने दुकानातील स्वच्छता तसेच रिकाम्या दुकानात माल भरण्याची व्यापाऱ्यांची लगबग सुरू झाली असून दुकाने सजवण्याचे काम सुरु झाले आहे.  शासनाच्या मंदिर खुले करण्याच्या निर्णयाचे सर्व स्तरातील नागरिकांनी स्वागत केले आहे. राज्य शासनाच्या आदेशानुसार चिवरी येथील महालक्ष्मी मंदिर मागील आठ महिन्यापासून कोरणा मारीच्या संकटामुळे बंद होते.

आरोग्य विभागाच्या अथक प्रयत्नानंतर महामारीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे. कोरोनाचा प्रसार कमी झाल्याने मुळे महाराष्ट्र शासनाने दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर राज्यातील मंदिरे दर्शनासाठी खुले करण्याचे आदेश दिले. त्या अनुषंगाने शासनाने दिलेल्या नियमाचे पालन करून चिवरी महालक्ष्मी चे मंदिर खुले करण्यात आले आहे. सध्या मंदिर परिसर भाविकांनी फुलून जात आहे. बऱ्याच दिवसानंतर प्रतीक्षेत असलेल्या भाविकांना दर्शन मिळत आहे. त्यामुळे भाविकांसह पुजारी मंडळाकडून समाधान व्यक्त होत आहे.

 
Top