नळदुर्ग, दि. 17 : दिवाळी पाडव्याचे औचित्य साधून नळदुर्ग शहरातील सामाजिक कार्याची आवड असणारे "भीमाशंकर बताले" यांच्या "हॉटेल गौरी" कडून पाडव्यापासून पासून सर्व अंध व अपंग अशा दिव्यांग व्यक्तीसाठी मोफत चहा-पाण्याची सोय करण्यात आली आहे.
आरंभ बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या संकल्पनेतून त्यांनी या उपक्रमाचे आयोजन केले याचे उद्घाटन सपोनि राऊत व जेष्ठ पत्रकार विलास येडगे यांच्या हस्ते करण्यात आले. या पूर्वी भीमाशंकर यांनी आरंभ बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दत्तक घेतलेल्या उपक्रमात सहभागी होऊन आर्थिक मदत केली आहे. भीमाशंकर यांनी घेतलेला हा निर्णय अभिनंदनीय आहे, याबद्दल संस्थेच्या वतीने भीमाशंकर यांचे संस्थेच्या वतीने आभार व्यक्त केले व भविष्यात देखील समाजासाठी आपले योगदान द्यावे अशी अपेक्षा व्यक्त केले.
या कार्यक्रमाला पत्रकार संघाचे अध्यक्ष सुहास येडगे, हॉटेल गौरी चे भीमाशंकर बताले, पत्रकार लतीफ शेख, भगवंत सुरवसे, सामाजिक कार्यकर्ते मारुती खारवे, संजय जाधव, दादासाहेब बनसोडे, अमर भाळे, गुंडप्पा डुकरे, अभिजित लाटे, बिटू मुळे, बबलू ईनामदार, संस्थेचे अध्यक्ष राहुल हजारे, सचिव श्रमिक पोतदार, कोषाध्यक्ष सागर हजारे, प्रसिद्धि प्रमुख सूरज आवटे, मयूर महाबोले आदी उपस्थित होते.