नळदुर्ग : एस.के. गायकवाड

जवाहर विद्यालय अणदुर ता.तुळजापूर येथील सेवानिवृत्त  मुख्याध्यापक मारुती मैलारी खोबरे गुरुजी यांची राज्यस्तरीय पैलवान रेवाप्प सोनकांबळे उत्कृष्ट मल्ल पंच पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

  कै.पैलवान रेवाप्पा सोनकांबळे क्रिडा प्रतिष्ठान नळदुर्ग,ता.तुळजापूरच्या वतीने कै.पैलवान रेवाप्पा सोनकांबळे यांच्या स्मरणार्थ देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय पैलवान रेवाप्पा सोनकांबळे उत्कृष्ट मल्ल पंच पुरस्कारासाठी निवड करण्यात आलीअसून दि.२२ नोव्हेंबर २०२०रोजी जनसेवा बहुउद्देशिय शिक्षणसंस्था नळदुर्ग व कै.पैलवान रेवाप्पा सोनकांबळे क्रिडा प्रतिष्ठान नळदुर्ग ता.तुळजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या राज्यसतरीय निबंध स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांचे बक्षीस वितरण पत्रकार भवन गांजवे चौक पुणे येथे डॉ. विरेंद्र नागराळे यांच्या अध्यक्ष तेखाली करण्यात येणार आहे. या भव्य समारंभात मारूती खोबरे गुरुजी  याना जेष्ठ साहित्यिक डॉ.शरण कुमार लिंबाळे यांच्या हस्ते तर आमदार सुनिल आण्णा टिंगरे यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर पुरस्काराने सन्मानीत  करण्यात येणार आहे. असी माहिती संस्था अध्यक्ष प्रा.आर.आर.सोनकांबळे,सचिव एस.के.गायकवाड यांनी दिली आहे.

सेवानिवृत्त मुख्याध्यापक मारूती खोबरे गुरुजी यांची राज्यस्तरिय उत्कृष्ट मल्ल पंच पुरस्कारासाठी निवड झाल्या बद्दल सामाजिक कार्यकर्ते आर.एस.गायकवाड, प्रभात मंडळाचे नरे गुरुजी, प्रा.मल्लिनाथ लंगडे, कैलास बोंगरगे, कुंभार गुरुजी,, भीमराव सुरवसे, महादेव मुळे, सह मित्रपरिवारानी अभिनंदन केले आहे.

 
Top