नळदुर्ग : एस.के.गायकवाड

संबंध विश्वाला समता, स्वतंत्र, बंधूता, अहिंसा व मानवतेची शिकवण देणारे विश्व शांतीदुत तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची प्रतिष्ठान पुज्य भन्ते सुमेतजी नागसेन यांच्या हस्ते करण्यात आली.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डी.डी. मस्के हे होते तर प्रमुख वक्ते म्हणून बुद्ध मूर्ती दानदाते तथा आंबेडकरी चळवळीतील साहित्यिक विचारवंत डॉ. डी.टी. गायकवाड हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षक भारतीचे जिल्हा अध्यक्ष भैरवनाथ कानडे, सहशिक्षिक मोहन माने, धनंजय बनजगोळे, माजी जि.प. सदस्य गणेश सोनटक्के, माजी उपसरपंच विवेकानंद मिलगिरे, प्रा. दत्तात्रय येडगे, राजु रेड्डी, मल्लिनाथ ताडकर, रिपाइंचे जिल्हा सचिव एस.के.गायकवाड, बलभीम पांढरे, उत्तम बनजगोळे आदी उपस्थित होते.

प्रारंभी तथागत भगवान गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून सामुदायिक वंदना घेवून संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले. याप्रसंगी बुद्ध मुर्ती दान दाते साहित्यिक डॉ. डी.टी. गायकवाड हे केंद्र शासनाच्या सेवेतून वर्ग १ चे आधिकारी म्हणून सेवानिवृत्त झाल्याबद्दल धम्मक्रांती बुद्ध विहार मंडळाच्यावतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी  मंडळाचे अध्यक्ष सतिश शिंदे, राजेंद्र शिंदे, लक्ष्मण शिंदे, मरगु शिंदे, राम कांबळे, लाडूशा शिंदे, सुधाकर शिंदे, महादेव शिंदे, जयहिंद वाघमारे, मलिक शिंदे, तानाजी कांबळे, सागर कांबळेसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top