जळकोट : मेघराज किलजे
तुळजापूर तालुक्यातील आलियाबाद येथे पोहरादेवी येथील संत रामराव बापू महाराज यांचे पुतणे जितू महाराज यांनी सदिच्छा भेट दिली.
प्रथमतः आलियाबाद येथील जगदंबा देवी संत सेवालाल महाराज मंदिरात महाराजांच्या हस्ते भोग लावून पुजा करण्यात आली. यावेळी त्यांनी सर्वांना आशीर्वाद रूपी मार्गदर्शन केले.यावेळी ग्रामस्थांच्यावतीने जिल्हा परिषदेचे सदस्य प्रकाश चव्हाण यांच्या हस्ते फेटा, शाल, श्रीफळ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.
यावेळी अमृता चव्हाण, माणिकराव चव्हाण, शिवाजी नाईक, पांडुरंग चव्हाण,नेमिनाथ चव्हाण, शिवाजी पोलीस पाटील, शिवाजी राठोड ,थावरू राठोड ,नामदेव नाईक, ताराचंद राठोड, मोतीराम राठोड, शिवाजी चव्हाण,हरीदास चव्हाण, श्रीमंत राठोड, किरण चव्हाण,नेमिनाथ राठोड, देविदास राठोड, गोविंद राठोड,आनंद राठोड, सुर्यकांत राठोड, मनोज राठोड, देविदास चव्हाण ,सुनील चव्हाण आदि ग्रामस्थ उपस्थित होते.