जळकोट : मेघराज किलजे
तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील श्री केदारलिंगेश्वर मंदिरासमोर असलेल्या श्री सिद्धेश्वर देवस्थान ट्रस्टच्या मठाच्या बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले.
जळकोट येथील श्री सिद्धेश्वर देवस्थान ट्रस्टचे मठ आहे. मठ जुन्या बांधकामाचे आहे. या मठाला दरवर्षी हजारो भाविक भेट देत असतात. दरवर्षी अनेक धार्मिक कार्यक्रम पार पडत असतात. या मठाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी श्री .सिद्धेश्वर देवस्थान ट्रस्टने मठाची नव्याने निर्मिती करण्याचे ठरवले आहे. २२लाख ५१ हजार रुपये नव्या वास्तुसाठी खर्च होणार आहेत. मठाच्या नव्या वास्तूमुळे जळकोटच्या विकासात नवी ओळख निर्माण होणार आहे. या बांधकामाचे भूमिपूजन माजी ग्रामपंचायत सदस्य शिवराज स्वामी व सौ. सुषमा स्वामी यांनी पूजन करून केले. श्री सिद्धेश्वर देवस्थान कट्टीमठ संस्थानचे मठाधिपती श्री.श्री.श्री.१०८ शिवानंद शिवाचार्य महास्वामीजी यांच्या मंत्रघोषात हा भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला.
यावेळी श्री सिद्धेश्वर देवस्थान कट्टी मठ संस्थानचे सचिव बाबुराव पटणे, सदस्य सिद्धया स्वामी, सदस्य शिवराज यादगौडा, सदस्य अनिल छत्रे, राम किलजे, मेघराज किलजे, राजेंद्र यादगौडा, माणिक आलुरे, प्रशांत कारले, शंकर स्वामी, शिवा कुंभार, संजय पिसे, बसवराज स्वामी, सिद्धू स्वामी, इंजिनीयर चव्हाण, पिंटू हासुरे आदीसह ट्रस्टचे पदाधिकारी, भक्तगण, ग्रामस्थ उपस्थित होते.