रेडा, दि. २२ : इंदापुर तालुक्यातील रस्ते दुरूस्तीत दुजाभाव होत असल्याने बारामती-कळंब-बावडा-नरसिंहपूर रस्त्यावरील गावातील नागरिक सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री व सोलापूर पालकमंत्री भरणे यांच्यावर नाराज असल्याचे दिसून येत आहे.
इंदापुर तालूक्यात ऑक्टोबर २०२० मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक रस्त्यांची वाताहात झाली यामध्ये प्रामुख्याने बारामती-इंदापुर या रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री व सोलापूर पालकमंत्री भरणे आपल्या परिसरातील घराजवळील रस्त्यावर २१ कोटी रुपये खर्च करून रस्त्याची तात्काळ दुरूस्ती केली.
परंतु बारामती-कळंब-बावडा-नरसिंहपूर या रस्त्यावर माञ २०४.७७ कोटी रुपयांचा निधी मंजूर असताना गेल्या वर्षभरात अदयाप " मुरूमाची पाटी " देखील टाकली नाही . पण सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री व सोलापूर पालकमंत्री भरणे आपल्या घरा परिसरातील रस्ते दुरूस्तीला प्राधान्य देत आहेत व आपले राजकिय प्रतिस्पर्धी बावडा गावाकडे जाणा-या रस्त्याच्या दुरूस्ती बाबत नाव ही घेयाला तयार नाहीत अशी खंत तावशी पासून कळंब, निमसाखर, रेडणी, लाखेवाडी सह बावडा गावातील नागरिक करित आहेत.
बारामती-कळंब-बावडा-नरसिंहपूर हा रस्ता इंदापुर तालुक्यातील सोपान काका पालखी मार्ग म्हणून मुख्य दळण वळणा साठी ओळला जातो या रस्त्यावरून वालचंदनगर पासून ते बावडा येथून अकलूजला शैक्षणिक आणी कृषी प्रक्रिया व साखर कारखाना यांना कच्चा माल वाहतुकीसाठी महत्वाचा आहे तर हाच रस्ता अकलूजहून सराटी पासून वालचंदनगर व बारामती-पुणेला शैक्षणिक इतर उदोगाधंदे आणी नोकरी निमित्त जातो .त्यातच उद्या सोमवार पासून इयत्ता ९ वी ते १२वी वर्ग सुरू होत आहे. या रस्त्यावरी ठिक-ठिकाणच्या मोठ्या ख॓ड्यामुळे संपुर्ण दळण वळण सुविधेसह एस टी सेवा बंद पडली आहे. त्यामुळे विद्यार्थी शाळेत जाणार कसे असा खडा सवाल पडला आहे?
या संदर्भात बारामती-कळंब-बावडा-नरसिंहपूर रस्त्याच्या सार्वजनिक बांधकाम उपविभाग (ससून) पुणे येथील उपअभियंता नगरे यांना संपर्क केला असता ते म्हणाले की, सदर रस्त्याची निविदा प्रक्रिया २०१९ मधे पुर्ण होउन कामाचा कार्यारंभ हा जानेवारी २०२० रोजी दिला आहे मध्यांतरी कोरोना लाॅकडाउन काळात काम थांबले होते. या कामाची सुरूवात हि मोरगाव-बारामती पर्यंत पुर्ण होत असून सध्या बारामती येथील गुनवडी चौकातून डोर्लेवाडी मार्गे कळंब बावडा पर्यंत लवकरत लवकर सुरू होईल असे सांगण्यात आले.
फोटो ओळ:-- इंदापुर तालुक्यातील बी के बी एन रस्त्यावरील खड्यामुळे वाहन चालकला पाण्याचा अंदाज घेत करावी लागते कसरत! (छाया: संतोष भोसले, रेडा)