नळदुर्ग : एस.के. गायकवाड

संस्कारक्षम पिढी घडविण्यासाठी ग्रामीण भागात धम्म चळवळीला गती मिळावी व चळवळीतील कार्यकर्त्याना प्रेरणा मिळावी म्हणून समिक्षा फाउंडेशनच्या वतीने बुद्ध मुर्ती दान करणे व कार्यकर्त्यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करणे, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करणे आदी समीक्षा फाउंडेशनचे कार्य प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन विचारवंत, साहित्यिक योगीराज वाघमारे यांनी लोहारा तालुक्यातील आष्टा (कासार) येथे बोलताना केले.

समिक्षा फाउंडेशन, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालय, लिंबूनी बुद्ध विहार मंडळ व डॉ. डी.टी. गायकवाड सेवापुर्ती सत्कार समिती आष्टा (कासार) यांच्या संयुक्त विद्यमाने पुरस्कार वितरण, पुस्तक प्रकाशन, बुध्द मुर्ती दान व सत्कार समारंभ असा भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन साहित्यिक योगीराज वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. यावेळी ते अध्यक्षिय स्थानावरून बोलत होते.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी जि.प. अध्यक्ष शिवदास कांबळे, ॲड. सयाजीराव शिंदे, दिलीप भालेराव, जि.प. सदस्य शोभाताई ताडकर, यशदाचे बबनराव जोगदंड, विष्णू सगर, गुंडेराव शिंदे आदी उपस्थित होते. प्रारंभी भगवान गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करून दिवंगत तुकाराम गायकवाड यांच्या स्मरणार्थ समिक्षा फाउंडेशनच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे डॉ. अरविंद भोरे, सुनील सुलतानपुरे, डॉ. किशोर पाटील, विजय पंडित, मारुती बनसोडे आदीना जिवन गौरव पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. तर इ.१० वी व १२वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा शालेय साहित्य देवून सत्कार करण्यात आला. 

यावेळी डॉ. डी.टी.गायकवाड लिखित विवेकवादी धम्म चळवळ, डॉ. डी.टी. गायकवाड सेवापुर्ती तिमिरातुन तेजाकडे गौरव विशेषांक व डॉ. प्रा.गौतम गायकवाड लिखित पिंपळ वृक्ष आदी पुस्तकांचे प्रकाशन करून केंद्र शासनाच्या सेवेतून वर्ग-१ चे अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झाल्याबद्दल समिक्षा फाउंडेशनचे मुख्य प्रवर्तक डॉ. डी.टी.गायकवाड यांचा सपत्नीक यथोचित सत्कार करण्यात आला.

तसेच मौजे सिंदगाव येथील बौध्द बांधवांना बुद्ध मुर्तीचे लोकार्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक फाउंडेशनच्या अध्यक्षा समिक्षा गायकवाड यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा. संतोष पवार व सुमित जानराव यांनी केले. तर आभार प्रदर्शन डॉ.प्रा. महादेव गायकवाड यांनी केले. याप्रसंगी आर.जी. गायकवाड, बाबुराव कांबळे, नागनाथ गायकवाड, कल्याणी कांबळे, सचिन गायकवाड, राजेंद्र सोनवणे, विठ्ठल गायकवाड, निलेश गायकवाड सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top