उस्मानाबाद : महेश पाटील

बेंबळी गावातील शेतकरी अशोक सोनट्टक्के यांचा मुलगा आशिष अशोक सोनट्टके याची भारतीय लष्कर (Indian Army) दलात निवड झाल्याबद्दल उस्मानाबाद जिल्हा ग्राहक संरक्षण कक्ष जिल्हाप्रमुख मोईन खान पठाण यांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला.

यावेळी बेंबळी येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्ञानदेव खापरे-पाटील, आकाश पाटील, संत ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यामंदिराचे सहशिक्षक विश्वजित बरडे, अझर खोंदे, प्रकाश माळवदकर, बाळासाहेब दाणे, विशाल सर्जे, हर्षल आगाशे आदीजण उपस्थित होते.

 
Top