जळकोट : मेघराज किलजे

राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त दीपावलीच्या पाडव्यादिवशी जळकोट येथील जिल्हा परिषदेचे माजी सदस्य गणेश सोनटक्के व मित्र मंडळाच्या वतीने जळकोट व परिसरातील पत्रकारांचा उल्लेखनीय कार्याबद्दल सत्कार करण्यात आला.

जळकोट येथे दरवर्षी गणेशराव सोनटक्के मित्र मंडळाच्या वतीने दीपावलीच्या भाऊबीजेच्या दिवशी जळकोट व परिसरातील हजारो बहिणींना भाऊबीजेची भेट देण्यात येते. यावर्षीच्या या कार्यक्रमात त्याच दिवशी राष्ट्रीय पत्रकार दिन असल्याने पत्रकारांचाही गौरव करण्यात आला. या कार्यक्रमात मेघराज किलजे, अरुण लोखंडे, विरभद्र पिसे, संजय रेणुके, महिला पत्रकार मनीषा गायकवाड, किशोर धुमाळ पत्रकारांचा गौरव करण्यात आला. 

यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष नेताजी पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य गणेशराव सोनटक्के, उस्मानाबाद पंचायत समिती माजी सभापती बालाजी गावडे, जळकोटचे माजी सरपंच तमन्नाप्पा माळगे, युवा नेते ऍड. आशिष सोनटक्के, जळकोट सोसायटीचे माजी चेअरमन रमेश सोनटक्के, नालंदा पाटील, महादेव पाटील, केदारलिंग देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष  बाबुराव पटणे, नसीर इनामदार ,हनुमंत सुरवसे, कस्तुरा कारभारी, रोहित कदम, दामू लोखंडे, इलाही ईलाही गडीवले, हजारो माता-भगिनी, ग्रामस्थ, युवक, कार्यकर्ते उपस्थित होते.

 
Top