चिवरी : राजगुरु साखरे

तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील माजी सैनिक विठ्ठल मारूती होगाडे यांच्या स्वखर्चातुन उभारलेले सैन्य, पोलीस भरती प्रशिक्षण केंद्र ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.या प्रशिक्षण केंद्रामध्ये शंभरहून अधिक मुले मुली प्रशिक्षण घेत आहेत. त्यांच्या या कार्याला प्रेरणा मिळावी आणि नविन पीढीला दिशा मिळावी म्हणून गावातील प्राध्यापक अप्पाराव वसुदेव हिंगमिरे यांच्याकडून अकरा हजार रुपये किमतीचे लेखी परीक्षेत अशी उपयुक्त  पुस्तके भेट दिली. 

यावेळी प्राध्यापक गौरीशंकर धुमाळ, सेवानिवृत्त प्राध्यापक बाबुराव शिंदे, यांनी तरुणांना मार्गदर्शन केले तसेच भावी पिढीच्या उद्धारासाठी सर्वांनी एकजुटीने योगदान द्यावे असे आव्हान आपल्या मनोगतात व्यक्त  केले. यावेळी सरपंच अशोक घोडके, उपसरपंच बालाजी पाटील, पोलीस पाटील, रुपेश बिराजदार, चेअरमन बालाजी शिंदे, सामाजिक कार्यकर्ते राजूसिंग कचुवाई, शिवराज भुजबळ, प्रशांत हिंगमिरे, किसन शिंदे, प्रकाश जाधव, बाळू देडे, शंकर बिराजदार, प्रवीण पाटील, महेश बलसुरे, वैभव कोरे आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.

 
Top