तुळजापूर, दि. 18 : नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तीचा बळी ठरलेला अन सोशल माध्यमांच्या गर्दीत जगाचा पोशिंदा हा कायमच उपेक्षित राहिला असून सरकार ही कायमस्वरूपी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत शेतक-यांची बाजू मांडणाऱ्या भूमिका दिवाळी अंकाचे प्रकाशन पार पडले.
शेतकरी बांधवांसाठी काढलेल्या भूमिका दिवाळी अंकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी नितीन राठोड, दास पाटील, पत्रकार अनिल आगलावे, क्रीडा प्रशिक्षक अनिल धोत्रे, देविदास सौदागर उपस्थित होते.
शेतकरी आंदोलक नितीन राठोड दिवाळी अंक भेट देण्यासाठी उस्मानाबाद वरून तुळजापूर येथे आले असता शेतकरी विरोधी कायदे मराठी साहित्यात आजचा शेतकरी आदी विषयांवर संवाद साधण्यात आला.