तुळजापूर, दि. १८ : मी  मास्क वापरणारच.... कोरोणा संसर्गाबाबत मराठी जनजागृती करणारे आकर्षक रांगोळ्यांनी तुळजाभवानी मंदिर परिसर दिवाळीच्या पाडव्या निमित्ताने सजविण्यात आले, तुळजापूर संस्कार भारतीने आपला २३ वा दिवाळी परिवार मेळावा या निमित्ताने साजरा केला.

तहसीलदार सौदागर तांदळे, राज्य संस्कृतिक पुरस्कार निवड समितीचे सदस्य डॉ. सतीश महामुनी, अध्यक्ष पद्माकर मोकाशे,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष मीनाताई सोमाजी, खरेदी-विक्री संघाचे चेअरमन शिवाजी बोधले,  सचिव सुधीर महामुनी, चित्रकार नंदकुमार पोतदार,संजयकुमार बोदर,  रांगोळीकार सौ प्रतिभा देशमुख, सौ अश्विनी कोंडो, सौ माधुरी करमरकर, सौ गीता व्यास, उमेश भिसे, अभिषेक लसणे, कु. श्रद्धा बोदर, कु. हिंदवी पाटील, कु. अंकिता लोंढे, अ. भा. वि. प.शहरमंत्री शिवा महामुनी, या सर्व कलाकारांनी मंदिर परिसरात होमकुंड, गोंधळ पार, सीमोल्लंघन पार, येमाई मंदिर , दत्त मंदिर, जामदारखाना, गणेश मंदिर याठिकाणी कोरोणा संसर्गाचा धोका लक्षात घेऊन जनजागृती करणारे स्लोगन वापरून रांगोळी रेखाटन करण्यात आले होते.

तहसीलदार सौदागर तांदळे यांनी या निमित्ताने तुळजापूर शहरातील नागरिकांना आणि सर्व कलावंतांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या, अध्यक्ष पद्माकर मोकाशी यांनी अनेक वर्षापासून संस्कार भारती सातत्याने दिवाळी पाडव्याला मंदिरात रांगोळ्यांचा दीपोत्सव साजरा करते यावर्षी या अडचणीच्या काळात शासनाच्या नियमांचे पालन करीत सर्व कलावंतांनी सहभाग नोंदविला बद्दल समाधान व्यक्त करून शहरवासीयांना शुभेच्छा दिल्या. विविधरंगी रांगोळ्यांमध्ये संसर्गाचे स्लोगन लिहिल्यामुळे भाविक भक्तांनी या रांगोळीचे उत्स्फूर्त स्वागत केले.

 
Top