उमरगा, दि. 01 : येथील आरोग्य नगरीमध्ये शनिवार दि. 31 ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांच्या शुभ हस्ते व उच्च न्यायालय औरंगाबादचे ॲड. दयानंद माळी यांच्या प्रमुख उपस्थितीत ओम लॅबचे उदघाटन करण्यात आले.
यावेळी नगरसेवक प्रा. दता इंगळे, माजी पोलिस निरीक्षक बाला राठोड, बालाजी पाटील, भिमा स्वामी, सरपंच संजय चव्हाण आदीजण उपस्थित होते.