अचलेर : जय गायकवाड 

लोहारा तालुक्यातील अचलेर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा (मुलांची)येथे मंगळवार दिनांक ३ रोजी सर्व शिक्षकांनी आपल्या स्वखर्चातून इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना स्वाध्याय पुस्तिकांचे वाटप केले.

यावेळी शाळेचे मुख्याध्यापक खंडागळे कृष्णा, कन्या शाळेचे मुख्याध्यापक आळांगे चंद्रकांत, सहशिक्षक सोमवंशी शंकर, बाबळे अतुल यांच्यासह पालक, विद्यार्थी उपस्थित होते. या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

 
Top