जळकोट : मेघराज किलजे
खुदावाडी (ता. तुळजापूर) येथील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या घरी आ राणाजगजितसिंह पाटील सांत्वन भेट भेट देऊन कुटुंबियांचे सात्वन केले.
खुदावाडी येथील काल दि.२२ रोजी कर्जबाजारीला कंटाळून सर्जेराव मारुती काटे यांनी दुर्दैवी आत्महत्या केली. त्याबद्दल तुळजापूर तालुक्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी काटे कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. आ. पाटील यांनी त्या कुटुंबाला शासकीय योग्य ती मदत मिळवून देऊ असे आश्वासन दिले.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे, उपाध्यक्ष दिपक आलुरे, चित्तरंजन सरडे, ग्रामसेवक महेश मोकाशे, उपसरपंच पांडुरंग बोगरगे, अमोल नरवडे, प्रा. संतोष सांगवे, विक्रम सांगवे, संगमेश्वर पाटील, शंकर काटे, मोहन नरवडे व गावातील नागरिक उपस्थित होते.