उस्मानाबाद, दि. 23 : 05-औरंगाबाद विभाग पदवीधर निवडणूक-2020चे मतदान दि.01 डिसेंबर-2020 (मंगळवार) रोजी सकाळी 8.00 ते सायंकाळी 5.00 वा.पर्यंत व मतमोजणी दि.03 डिसेंबर-2020 रोजी होणार आहे.

तरी या निवडणूकीसाठी मतदार असलेल्या पदवीधर/शिक्षक मतदारांना निवडणूकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावता येण्यासाठी मतदानाच्या दिवसाची दिनांक 1 डिसेंबर रोजी विशेष नैमित्तीक रजा द्यावी, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

 
Top