उस्मानाबाद, दि. 23  : 05-औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ निवडणूक कार्यक्रम-2020 अंतर्गत दि.01 डिसेंबर-2020 रोजी सकाळी 8.00 ते सायंकाळी 5.00 या वेळेत मतदान होणार आहे.त्यानुषंगाने मतदान संपण्यापुर्वी 48 तास अगोदर जिल्हयामध्ये कोरडा दिवस जाहिर करण्याबाबत निर्देश आहेत.

त्यानुषंगाने दि.29 नोव्हेंबर-2020 रोजी सायंकाळी 5.00 वा.पासून ते 01 डिसेंबर-2020 रोजी सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत संपुर्ण उस्मानाबाद जिल्हयात सर्व मद्य विक्री अनुज्ञप्त्या बंद ठेवण्यात याव्यात. या आदेशाचा भंग करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकाविरुध्द मुंबई दारुबंदी कायदा 1949 कलम 54 व 54 अंतर्गत कडक कारवाई करण्यात येईल, याची सर्व अनुज्ञप्तीधारकांनी नोंद घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिले आहेत.

 
Top