रेडा, दि. 23 : राज्य सरकारच्या आदेशानुसार इंदापूर तालुक्यातील रेडणी-काटी व रेडा परिसरातील इयत्ता ९ वी ते १० वी चे वर्ग सुरू करण्याचा निर्णय स्थानिक शाळा व्यावस्थापण समिती, ग्रामपंचायत प्रशासन, व महसूल प्रशासन च्या संमतीने घेतला. याबरोबर शासनाच्या मार्गदर्शकसुचनेनुसार नवी, दहावी वर्गखोल्याचे सिॅनिटायजर करून पूर्ण निरजंतूक केले.
विद्यार्थी शाळेत आल्यानंतर शाळेच्या मार्फत ऑक्सीमिटर थर्मामीटर तसेच सॅनिटायजर तयार ठेवले होते. तसेच स्वच्छ पिण्याचे पाणी व स्वच्छतागृह सह संपुर्ण परिसर स्वच्छ ठेवला. शाळेतील शिक्षकाबरोबर शालेय कर्मचारी यांचीही कोविड-19 च्या तपासणी करून घेतली होती, असे कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक विद्यालय रेडणीचे मुख्याधपक बी बी आटोळे व काटेश्वर विद्यालय काटीचे मुख्याध्यापक डोईफोडे यांनी सांगितले.
रेडा गावात मात्र शाळा बंदच ठेवण्याचा निर्णय मुख्याध्यापक यांनी घेतला. सध्याच्या कोविड 19 या साथीच्या गंभीर आजाराने थैमान घेतल्याने पालकवर्गाने मुलांना शाळेत पाठवण्यास धाडस केले नाही. त्यामुळे गेली आठ महिन्यापासून कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर बंद असलेली शाळेची घंटा वाजली पण " विद्यार्थी अभावी शाळा ओस पडली " अशी अवस्था झाली.