नळदुर्ग, दि. २० : महाराष्ट्र सरकारने वीज बिलात कसलीही सूट दिली नाही. सरकारला मनसेनी सोमवार पर्यंतचा वेळ दिला आहे. वीज बिल माफी साठी महावितरण सक्तीची वीज बिल वसुली करत असेल अथवा नळदुर्ग शहर व परिसरातील ग्राहकांची वीज कापत असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिका-याशी संपर्क साधण्याचे आवाहन मनसेचे शहराध्यक्ष अलिम शेख, जिल्हा सचिव ज्योतिबा येडगे, शहराध्यक्ष अलीम शेख,शहर सरचिटणीस प्रमोद कुलकर्णी, शहर उपाध्यक्ष रमेश घोडके,मनविसे शहराध्यक्ष सूरज चव्हाण, शहर सचिव भाऊराज कांबळे यांनी केले आहे.