जळकोट : मेघराज किलजे
तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथे पहिल्या महिला पंतप्रधान श्रीमती इंदिराजी गांधी यांच्या जयंती निमित्त उस्मानाबाद जिल्हा युवक कॉंग्रेसच्यावतीने जळकोट येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात य फळे वाटप करण्यात आले.गावातील व्यापारी वर्गाला मास्क वाटप करण्यात आले व गावात वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र युवक कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस व उस्मानाबाद जिल्हा प्रभारी विनोद भोसले, श्रीनिवास पाटील, माजी ग्रा.पं. सदस्य गजेंद्र कदम, शंकर वाडीकार, डी.डी. कदम, ओंकार कदम, रामशेट्टी पाटील, असद इनामदार, प्रविण पाटील, सौरभ कदम, अजय गंगंणे, सुदर्शन पवार, सागर करंडे, सागर किरवले, रोहन कदम, महेश कुठार, महेश कदम, फय्याज शेख, ओंकार इगवे, प्रसाद हत्ते, ओंकार पट्टेवाले आदी पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक व ग्रामस्थ उपस्थित होते.