किलज : राम जळकोटे
तुळजापूर तालुक्यातील किलज येथे दरवर्षी किलज ते मन्मथ स्वामी पायी दिंडी सोहळा हा जात असे. परंतु यंदाच्या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावातील मंदिर कमिटीने गावाला प्रदक्षिणा घालूनच साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.
गावातील बेले वस्ती येथे बांधण्यात आलेल्या मन्मथ स्वामी मंदिर येथे या सोहळ्याचा समारोप झाला असून या पायी दिंडी सोहळा साठी परिसरातील वडगाव, होरटी, बारूळ, तसेच इतर ठिकाणाहून भाविक उपस्थित झाले होते.दरवर्षी प्रमाणेच परंतु गावाला प्रदक्षिणा घालून यावर्षी हा पायी दिंडी सोहळा पार पडला.
यावेळी तरुण वर्ग तसेच महिला भजनी मंडळ हा वर्ग मोठ्या उत्साहात होता. योग्य ती खबरदारी घेत हा पायी दिंडी सोहळा पार पडला.