उस्मानाबाद, दि. 30 : शहरातील रोटरी क्लब ऑफ उस्मानाबाद, सन ग्रुप तर्फे आळणी येथील स्वाधार मतिमंद बालक आश्रम मध्ये शुक्रवार दि.27 रोजी यंदाच्या दिवाळीनिमित्त ठरवल्याप्रमाणे स्वाधार मतिमंद मुलींचे आश्रम, आळणी या संस्थेला भाऊबीज भेट म्हणून दररोज च्या वापरासाठी एक पिठाची चक्की व दोन कपाटे मान्यवरांचे हस्ते सुपूर्द करण्यात आली.
सदरील छोटेखानी कार्यक्रम शुक्रवार 27 रोजी सकाळी 10:30 वाजता मतिमंद मुलींचे आश्रमात आयोजित करण्यात आला होता. सर्व रोटरी बंधूनी तसेच सन ग्रुप यांनी भरभरून मदत केल्यामुळे हे शक्य झाले. या वेळी स्वाधार मतिमंद आश्रम शाळेतील शिक्षक,कर्मचारी,प्रातिनिधिक विध्यार्थी तसेच रोटरीचे पदाधिकारी,सन ग्रुप चे सदस्य उपस्थित होते.
या कार्यक्रमानंतर लगेच रोटरी क्लब चे अध्यक्ष अमरसिंह बाजीराव देशमुख,सचिव इंद्रजित आखाडे, रोटेरीएन व सन ग्रुपचे सदस्य चंदररावजी गणपतराव डोके यांनी वयाची 100 वर्षे पूर्ण केल्याबद्दल त्यांच्या घरी जाऊन रोटरी क्लब तर्फे गौरवपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
या वेळी रोटरीचे अध्यक्ष अमरसिंह बाजीराव देशमुख, सचिव इंद्रजित आखाडे,माजी नगराध्यक्ष संपतराव डोके, रो.रविंद्र साळुंके, सुनिल गर्जे, अभिजित पवार, आदी मान्यवर उपस्थित होते.