उस्मानाबाद, दि. 30 : नृत्य परिषदेचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात विविध जिल्ह्यातील सर्व नृत्यप्रेमी व नृत्य दिग्दर्शक यांना एकत्रीत करुन यांच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी व नृत्य क्षेत्रात वाढ करण्यासाठी नृत्य परिषदेची जिल्हानिहाय कार्यकारणी जाहिर करण्यात आली. २८ नोव्हेंबर २०२० रोजी उस्मानाबादेत झालेल्या बैठकीत जमलेल्या सर्व नृत्य शिक्षक, नृत्य दिग्दर्शकांना व नृत्यकर्मींना नृत्य परिषदेची ध्येय धोरणे सांगण्यात आली. या बैठकी दरम्यान सर्वानुमते जिल्हाध्यक्ष, मुख्य कार्यवाहक,खजिनदार तसेच प्रत्येक तालुक्यातुन एक उपाध्यक्ष अशी निवड करण्यात आली.

उस्मानाबाद जिल्हा अध्यक्षपदी संगिता पाटील, उस्मानाबाद तर सचिवपदी शुभम खोत यांची निवड करण्यात आली.संघटक निलेश लोंढे, युवती ज्येष्ठापदी प्रिती गायकवाड,खजिनदार म्हणून साई पवार यांची निवड करण्यात आली. उर्वरित पदाधिकारी तालुका निवड लवकरच करण्यात येईल व नृत्य परिषदे मार्फत सर्व नृत्य कलावंतांच्या अडचणी शासन दरबारी मांडून नृत्य कलावंतांना न्याय मिळून देण्याचे काम नृत्य परिषद करील असे मत नृत्य परिषदेचे राज्य उपाध्यक्ष डाॅ. विनोद निकम यांनी व्यक्त केले. या बैठकीस नृत्य परिषद महाराष्ट्र राज्य कार्यकारणी पदाधिकारी जतिन पांडे(कार्यकारणी सदस्य),आशुतोष राठोड(कार्याध्यक्ष),रत्नाकर शेळके(उपाध्यक्ष),अभिजीत संकाये(सल्लागार) व मयूर राजापुरे (मराठवाडा विभाग प्रमूख ),सचिन गोणे (लातुर जिल्हा अध्यक्ष ) व जिल्ह्यातील नृत्य दिग्दर्शक उपस्थित होते.

 
Top