उस्मानाबाद, दि. 01 : प्रहार जनशक्ती पक्ष उस्मानाबाद जिल्हाच्या वतीने आज रविवार दि. 1 नोव्हेंबर रोजी शासकीय विश्रामगृह उस्मानाबाद येथे औरंगाबाद पदवीधर मतदारासाठी महत्वपूर्ण बैठक पार पडली. सदरची बैठक ही जिल्हाप्रमुख केदार सौदागर यांच्या नेतृत्वाखाली झाली.
या बैठकीत उस्मानाबाद जिल्ह्यातील प्रत्येक तालुका प्रमुखांना आपल्या तालुक्यामध्ये पदवीधर मतदान नोंदणी करावी, तसेच पदवीधरांचे काही अडचणी, त्यांचे प्रश्न असतील तर जाणून घ्या व ते सोडवण्याचा प्रयत्न करा, येणाऱ्या पदवीधर मतदानासाठी प्रत्येक बूथ मेंबर तयार करून त्यांचे नाव मोबाईल नंबर अशा प्रकारे यादी तयार करावी व वरिष्ठांना पाठवावी असे आदेश देण्यात आले.
त्याचबरोबर औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार सचिन ढवळे यांना आपल्या प्रत्येक जिल्ह्यातील बूथ वर जास्तीत जास्त मतदान कसे होईल याकडे प्रत्येक तालुकाध्यक्ष यांनी वैयक्तिक लक्ष द्यावे असे आदेश जिल्हाप्रमुख केदार सौदागर यांनी प्रत्येक तालुका प्रमुखांना दिले.
या बैठकीस उस्मानाबाद जिल्ह्याचे प्रहार जनशक्ती पक्षाचे युवक जिल्हाप्रमुख मनोज जाधव, उस्मानाबाद शहराध्यक्ष प्रजय पवार, तुळजापूर तालुका उपाध्यक्ष जुबेर शेख, परंडा तालुका दिनेश गुडे, परंडा तालुका रुग्णसेवक तय्यब शेख, लोहार-उमरगा तालुकाध्यक्ष दयानंद राठोड, तुळजापूर युवक तालुका अध्यक्ष अजित हुंडेकरी यांच्यासह प्रहार सैनिक उपस्थित होते.