उस्मानाबाद, दि. 04 :
उस्मानाबाद येथील प्रतिष्ठान भवनात मराठवाडा संयोजक हर्षवर्धन कराड यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली व भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आत्मनिर्भर भारत आढावा बैठक संपन्न झाली. 

केंद्र शासनामार्फत आत्मनिर्भर पॅकेज अंतर्गत येणाऱ्या विविध योजना संबंधित योजनांची कार्यालय व अधिकृत वेबसाईट याविषयीची सविस्तर माहिती या बैठकीत हर्षवर्धन कराड यांनी दिली. लवकरच प्रतिष्ठान भवन येथे आत्मनिर्भर भारत मार्गदर्शन केंद्र स्थापन करण्याविषयीची माहिती भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर यांनी दिली.

या बैठकीस शहराध्यक्ष राहुल काकडे, कुलदीप भोसले, राहुल शिंदे, सचिन लोंढे, अमित कदम यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


 
Top