तुळजापूर, दि. 23 : राज्य पंचायतराज समिती सदस्य (PRC) तसेच जिल्हा नियोजन समिती उस्मानाबाद कार्यकारी समितीमध्ये विशेष निमंत्रित सदस्य म्हणून शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार कैलासवपाटील यांची निवड झाल्याबद्दल तुळजापूर तालुका शिवसेनेच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला.

यावेळी आ. कैलास पाटील यांनी बोलताना सांगितले की ,येणा-या काळात तुळजापूर तालुक्यात माझा महाराष्ट्र भगवा महाराष्ट्र या अभियानांतर्गत गाव तेथे शाखा व घर तेथे शिवसैनिक तसेच तालुकाभर शिवसेना सदस्य नोंदणी अभियान मोठ्या प्रमाणावर राबवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी शिवसेना उपतालुका प्रमुख रोहित नागनाथराव चव्हाण, शिवसेना सोशल मिडीया तालुकाप्रमुख चेतन बंडगर, सिंदफळ सोशल मिडीया विभाग प्रमुख सिद्राम कारभारी, बालाजी पांचाळ, विनोद दुपारगुडे, कुमार साखरे आदी शिवसैनिक उपस्थित होते.

 
Top