उस्मानाबाद, दि. 23 : शहरातील निवासी वसाहतीतील संस्कार वर्गाच्या वतीने घेण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धेत विविध वयोगटातील १५ स्पर्धकांनी सहभाग नोंदवून आकर्षक रांगोळ्या साकारल्या.
सहभागी स्पर्धकांमधून डॉ. पल्लवी शतानंद दहिटणकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला. सार्थक शेषनाथ वाघ हिने द्वितीय तर विशाखा संभाजी बागल व दिशा संदीप सलगर हिने तृतीय क्रमांक पटकावला. विजेत्या स्पर्धकांना संस्कार भारती समितीच्या चित्रकला विभागप्रमुख रोहिणी नायगावकर यांच्या हस्ते स्वामी विवेकानंद यांचे पुस्तक, डायरी व पुष्प देण्यात आले. यावेळी बक्षीसपात्र स्पर्धक व सहभागींना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या रांगोळी स्पर्धेचे परीक्षण साहित्यिक माधव गरड, डॉ. रुपेशकुमार जावळे, कलाध्यापक शेषनाथ वाघ, छायाचित्रकार विजय महामुनी यांनी केले.
दरम्यान, कार्यक्रमाचे प्रास्ताविक सत्यहरी वाघ यांनी केले तर छायाचित्रण आदित्य सलगर यांनी केले. सूत्रसंचालन निकिता इंदापूरकर यांनी तर आभार कल्याणी वाकुरे यांनी मानले.