उस्मानाबाद, दि. 27 : अभाविप उस्मानाबाद शाखेतर्फे  संविधान प्रास्ताविकेचे वाचन करून संविधान दिवस साजरा करण्यात आला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमाला पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. राष्ट्राच्या निर्माण व भविष्यासाठी भारतीय संविधानाचे महत्त्व व  बाबासाहेबांचे संविधान निर्मितीतील योगदानाची यावेळी चर्चा करण्यात आली. समर्थ आगळे यांनी संविधान प्रास्ताविका वाचन केले.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद उस्मानाबाद शाखेच्या वतीने मुंबई या ठिकाणी झालेल्या 26/11 च्या भ्याड हल्ल्यातील शहीद जवानांना पोलीस बांधवांना व त्या हल्ल्यातील मृत पावलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली वाहण्यात आली. व त्याचबरोबर या हल्ल्याचा निषेध करत विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी उस्मानाबाद शहरमंत्री नितेश कोकाटे, तुषार भातलवंडे, समर्थ आगळे,सचिन खोचरे,अमोल माळी, ऐश्वर्या शेरकर, गंगाधर कोलमवार, अभि दळवे, आदर्श काकडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

 
Top