काटी : उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील कुंभारी येथे गुरुवार दि.26 रोजी येथील दिलपाक प्रतिष्टानच्या वतीने येथील बुद्ध विहारात संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस उपसरपंच पंडित पाटील, पोलिस पाटील विठ्ठल वडणे, रूबाब पठाण, मोहन बरडे, आप्पा दिलपाक यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
प्रारंभी सामुहिकरित्या उद्दीशिकेचे वाचन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांनी संविधानाविषयी आपले विचार व मनोगत व्यक्त केले तसेच आज तमाम भारतीयांना देशापासुन गाव पातळीपर्यंत एका धाग्यात जोडणारे समता, बंधुता व समान अधिकार बहाल करणारे संविधान याबाबत जनजागृती करण्यासाठी सर्वजण मिळून प्रयत्न करू अशी भावना सर्व मान्यवरांनी व्यक्त केली.
सुत्रसंचलन आप्पा दिलपाक तर आभार प्रदर्शन मधुकर दिलपाक यांनी केले. सदरील कार्यक्रमाची सांगता सामुहिकरित्या राष्ट्रगीत घेऊन करण्यात आली. यावेळी उपसरपंच पंडित पाटील, पोलिस पाटील विठ्ठल वडणे ,रूबाब पठाण, मोहन बरडे ,आप्पा दिलपाक , मधुकर दिलपाक,संकेत दिलपाक , बालाजी दिलपाक , बाबा दिलपाक ,संतोष दिलपाक, मनोज दिलपाक, समाधान दिलपाक यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.