उस्मानाबाद, दि. 04 : औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक 2020 चा या निवडणूकीचा कार्यक्रम दिनांक 02 नोव्हेंबर 2020 रोजी जाहीर केलेला असुन त्यानुसार निवडणूकीच्या प्रक्रियेस दिनांक 05 नोव्हेंबर 2020 पासून सुरुवात झालेली आहे.
भारत निवडणूक आयोगाने 05 औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक 2020 साठी दिनांक 02 नोव्हेंबर 2020 ते 07 डिसेंबर 2020 या कालावधीसाठी आदर्श निवडणूक आचार संहिता लागू केलेली आहे.
भारत निवडणूक आयोगाने अधिकाराचा वापर करुन सदर निवडणूका विना अडथळा व शांततेने पार पाडण्यासाठी निवडणूकीच्या काळात लाउडस्पीकर वापरण्यावर आयोगाने प्रतिबंध केला आहे.
जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, कौस्तुभ दिवेगावकर यांनी फौजदारी प्रक्रीया संहीता 1973 चे कलम 144 अन्वये मला प्रदान करण्यांत आलेल्या अधिकाराचा वापर करुन उस्मानाबाद जिल्हयातील सर्व विधानसभा मतदार संघाच्या हद्दीत पूढील प्रमाणे आदेश जारी केले आहेत.
कोणत्याही वाहनांवर ध्वनीक्षेपक बसवुन त्याचा वापर फक्त सकाळी 06.00 वाजले पासून ते रात्री 22.00 वाजे पर्यंत सबंधित पोलीस स्टेशन अधिकारी यांची रितसर परवानगी घेऊन करता येईल असा वापर करत असतांना वाहन चालू ठेऊन ध्वनीक्षेपकाचा वापर करता येणार नाही. सर्व प्रकारच्या ध्वनीक्षेपकाचे वापरास वाहनावर बसवुन किंवा अन्य प्रकारे दररोज सकाळी 06.00 वाजले पासून ते रात्री 22.00 वाजे पर्यंत परवानगी राहील. सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी/निवडणूकीचे उमेदवार किंवा ध्वनीक्षेपकाचा वापर वाहनावर बसवुन किंवा प्रकारे करणारे लोकांनी ध्वनीक्षेपकाचे वापराचे परवानगी विवरण मतदार संघ निवडणूक निर्णय अधिकारी व जवळच्या पोलीस स्टेशनला देणे बंधनकारक राहील.
या आदेशाचा कोणीही कोणत्याही प्रकारे भंग केल्यास ती व्यक्ती भारतीय दंड विधान संहिता कलम 188 प्रमाणे शिक्षेस पात्र होईल. सदर बंदी आदेश हा दिनांक 02 नोव्हेंबर 2020 पासून उस्मानाबाद जिल्हयात सर्व विधानसभा मतदार संघाचे हद्दीत दिनांक 07 डिसेंबर 2020 पर्यंत अंमलात राहील असे ही आदेशात नमुद केले आहे.