तुळजापुर : कुमार नाईकवाडी

संसर्गजन्य कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तुळजापुर शहरातील कोविड 19 उपचार केंद्र, 108 भक्तनिवास येथील सफाई कामगार अथक परिश्रम घेत असल्यामुळे त्या कामगारानी मोलाची साथ दिली. यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विजय गंगणे यांच्या वतीने शुक्रवार दि. १३ रोजी 108 भक्त निवास येथील सफाई कामगारांना  दिवाळी सणाचे औचित्य किराणा साहित्य भेट देऊन पुष्प गुच्छ देऊन फेटा बांधुन सत्कार करण्यात आला.

यावेळी बिभीषण माने, सचिन पवार, बंडु काशीद, सौदागर पौळ, दिपक शिंदे, राम शिंदे, विजय काटकर, सनोज कराळे, ओंकार हरणमारे, अमर कदम, आर्जुन बनपट्टे, सागर पोतदार आदींची उपस्थिती होती.

 
Top