काळेगाव, दि. 13 : तुळजापूर तालुक्यातील काळेगाव येथील ज्येष्ठ नागरिक तथा तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मनोहर मारूती उंबरे यांचे आज पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाने गावावर दु:खाचा डोंगर कोसळला असून कधीही उणीव भरून निघणार नाही, असे हे निर्भीड, कणखर व्यक्तीमत्व आज काळेगाव ने हरवला, अशी चर्चा संपुर्ण गावातून केली जात आहे