जळकोट : मेघराज किलजे
तुळजापुर तालुक्यातील आलियाबाद येथे बंजारा समाजाचे धर्मगुरू संत तपस्वी डॉ. रामराव बापू महाराज यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
डॉ. रामराव बापू महाराज यांचे मुंबईत शुक्रवारी निधन झाले होते.त्यांची अंत्यविधी बंजारा समाजाची काशी समजल्या जाणाऱ्या पोहरादेवी येथे रविवारी शासकीय इतमामात झाली. आज आलियाबाद येथे संत तपस्वी डॉ. रामराव महाराज यांना श्रद्धांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश चव्हाण, अमृता चव्हाण, माणिकराव चव्हाण, पांडुरंग चव्हाण, सुभाष नाईक, नेमिनाथ चव्हाण,ताराचंद राठोड,थावरु राठोड,शंकर राठोड, सिताराम राठोड, रामचंद्र पवार, शिवाजी पोलीस पाटील, श्रीमंत राठोड,व्यकंट राठोड,बाबु राठोड,रेवाप्पा राठोड,शंकर चव्हाण, कांत पवार, मोतीराम राठोड, गोविंद जाधव, मुख्याध्यापक विनायक राठोड उपस्थित होते.