नळदुर्ग, दि. 30 : शहरातील वैष्णवनगर येथील शिवनेरी तरुण मंडळाची सार्वजनिक जागा सर्व्हे नं. 236 मध्ये असून जागा सर्व्हे नं. 377/378 घर क्रं. 1822 ही जागा बेकायदेशीरपणे खरेदी विक्री केली असल्यामुळे राजेंद्र श्रीमंत गायकवाड यांची 8 अ नोंद रद्द करण्याबरोबरच न.प. च्या संबंधित अधिकारी व कर्मचा-यांवर गुन्हे दाखल करावेत अन्यथा 4 डिसेंबर रोजी सकाळी वाजता उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्महदहन करण्याचा इशारा नळदुर्ग येथील सुनिल सुरेश चौधरी यांनी जिल्हाधिका-यांना दिलेल्या निवेदनात दिली आहे.
निवेदनात नमूद केले आहे की, नळदुर्ग येथील सर्व्हे नं. 377/78 मध्ये घर क्रं. 1822 ही जागा चुकीच्या नोंदी घेऊन फेरफार रजिस्टर वरील नोंदीमध्ये बदल करुन खरेदी विक्री केलेली आहे. यामध्ये मोठ्याप्रमाणात आर्थिक भ्रष्टाचार हे न.प. चे अधिकारी व कर्मचा-यांनी केलेले आहे. मी माहिती अधिकारामध्ये सदरील जागेची माहिती मागितली असता मला दि. 13 ऑक्टोबर 2020 रोजी अहवाल देण्यात आला. त्या अहवालामध्ये सदरील नोंदी या नजरचुकीने लावण्यात आलेल्या असून त्या रदद करण्यात येतील असे सांगण्यात आले. तर दुसरीकडे संबंधित जागा खरेदीदारास 8 अ चा उतारा देण्यात आला असल्याचा अजब कारभार न.प. च्या मुख्याधिका-यांनी केला आहे.
सदरील जागा ही सार्वजनिक असून त्या जागेबाबत दोन वेळा नोंदी रद्द करण्यात आल्याव व परत त्या नोंदी घेण्यात आलेल्या आहेत. मी वारंवार न.प. मध्ये सदरील जागेबाबत लेखी तक्रार दिलेल्या आहेत. नंतर त्याचे समाधानकारक उत्तर मला देण्यात आले नाही. सदरील अहवालामध्ये मुख्याधिका-यांनी संबंधित कर्मचा-यावर कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिले आहे. मात्र अद्याप याबाबत कुणावरही कारवाई न करता उलट त्या जागेची खरेदी विक्री करुन घेतलेली आहे. त्याचबरोबर या जागेवर न.प. ने बांधकाम परवाना घेऊन नगरपरिषद सार्वजनिक सभागृहाचे बांधकाम परवाना व संबंधित ठेकेदाराला सभागृहाचे बांधकाम करण्यासाठी वर्कऑर्डन सुध्दा दिलेले आहे. त्याची तांत्रिक तपासणी करुन 21 लाख 19 हजार 330 रुपयांच्या बांधकामाची तांत्रिक मान्यता मिळवून न.प.ने सभागृह बांधकामास सुरुवात केली आहे. त्यामुळे सदरील सर्व्हे नं. 236 च्या बाहजूस असलेली सर्व्हे नं. 377/78 मधील घर क्रं. 1822 ची नोंद रद्द करुन शासकीय जमीन बळकावून त्याची खरेदी विक्री करुन शासनाची फसवणूक केली आहे. आजपर्यंत या जागेमध्ये गेल्या 30 वर्षापासून सार्वजनिक उत्सव साजरे केले जातात व त्याच जागेची खरेदी विक्री करुन भ्रष्टाचार करण्यात आलेला आहे. आपण या प्रकरणात लक्ष घालून सदरील जागेची नोंद रद्द करावी अन्यथा दि. 4 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहर करणार आहे, असे या निवेदनात म्हटले आहे.
या निवेदनाच्या प्रती माहितीस्तव जिल्हा पोलीस अधिक्षक, उपविभागीय अधिकारी तुळजापूर, तहसिलदार तुळजापूर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पोलीस ठाणे नळदुर्ग व मुख्याधिकारी न.प. नळदुर्ग यांनाही देण्यात आल्या आहेत.