ताज्या घडामोडी


नळदुर्ग : हजरत टिपू सुलतान रहे अलै यांच्या जयंतीचे औचित्य साधून नळदुर्ग एज्युकेशन वेल्फेअर असोसिएशन व टिपू सुलतान जयंती उत्सव समिती च्या वतीने शहरातील हजरत सय्यद सादिक शाह वली दर्गाह मध्ये 29 नोव्हेंबर रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिरामध्ये 30 रक्तदात्यांनी रक्तदान केले.

 रक्तदान शिबिराची सुरुवात ज्येष्ठ पत्रकार विलास येडगे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नळदुर्ग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश राऊत, सुधीर मोटे, पोलीस उपनिरीक्षक कैलास लहाने, पोलीस कॉन्स्टेबल मोबीन शेख, नळदुर्ग शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष सुहास येडगे, पत्रकार शिवाजी नाईक, तानाजी जाधव, आयुब शेख, उत्तम बनजगोळे, भाजपा शहराध्यक्ष पद्माकर घोडके, सामाजिक कार्यकर्ते संजय जाधव, अमर भाळे, रहेमान कुरेशी,बशीर शेख,शोहेब काजी,अयान कुरेशी हे उपस्थित होते. यावेळी रक्तदात्यांना प्रमाणपत्र व पाण्याच्या जार चे वाटप करण्यात आले.

 रक्त संकलन करण्याकरिता अश्विनी ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय व रक्तपेढी कुंभारीचे जनसंपर्क अधिकारी नागार्जुन जिंकले, सोमनाथ बिराजदार, सचिन शिरसागर यांच्यासह संपूर्ण स्टॉप उपस्थित होता. हा रक्तदान शिबिर यशस्वी करण्याकरिता नळदुर्ग एज्युकेशन वेल्फेअर असोसिएशन'चे अध्यक्ष लतीफ मामा शेख,रुकनोद्दीन शेख, युनुस शेख,खालेद इनामदार, आमेर शेख, वसीम कुरेशी, अलीम शेख, सज्जाद सावकार, टिपू सुलतान जयंती उत्सव समितीचे प्रमुख गौस कुरेशी, वसीम कुरेशी, वाजीद सौदागर अल महद कमिटीचे अक्रम काजी, हॅन्डस फॉर हेल्प सोसायटीचे अवेज शेख यांनी परिश्रम घेतले.

 
Top