चिवरी : राजगुरू साखरे
संपूर्ण जगभर थैमान घातलेल्या कोरोनामुळे सर्व व्यवहार ठप्प झाले होते. यामुळे शाळा महाविद्यालय बंद करण्यात आले आहेत, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी सुट्टीच्या कालावधीत ऑनलाईन अभ्यासक्रमाची आवड निर्माण व्हावी यासाठी तुळजापूर तालुक्यातील देवसिंगा तूळ येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक अनंत फुलसुंदर यांनी लॉकडाउनच्या कालखंडात इयत्ता पहिली ते दहावी पर्यंतच्या शालेय ग्रुप ची निर्मिती केली.
यामध्ये पालक विद्यार्थी व इतर शिक्षक असा समावेश करून ग्रुप तयार करण्यात आला, या ग्रुपच्या माध्यमातून दररोज प्रत्येक वर्गासाठी अभ्यास पाठवणे, सराव परीक्षा घेणे, आदी बाबीचे विद्यार्थ्यांना दररोज ग्रुपच्या माध्यमातून प्रशिक्षण देत आहेत, या उपक्रमासाठी त्यांना नवोदय वर्गमित्र रामकिशन गायकवाड (कळंब), माध्यमिक शिक्षक, तसेच रवींद्र भालेराव जुनिअर कॉलेज विक्रोळी मुंबई यांना ॲडमिन करून त्यांच्या सहकार्याने दररोज विद्यार्थ्यांना ऑनलाईन अभ्यास पाठवण्याचे काम विनाखंड चालू आहे, या त्यांच्या कार्यात प्रा. अमोल कापसे, यांच्या एकदम सोप्या भाषेतील असणारे जवळपास एकशे दहा दर्जेदार युटब व्हिडिओच्या माध्यमातून योगदान दिले जात आहे, नवोदय वर्गमित्र शिक्षकांनी चालू केलेल्या उपक्रमाचा पालक वर्गातून तसेच विद्यार्थ्यांतून मोठा प्रतिसाद मिळत आहे.