नळदुर्ग : एस.के. गायकवाड

दि. २६ नोव्हेंबर रोजी भारतात सर्वत्र संविधान दिन मोठ्या उत्सहाने साजरा करण्यात आला. त्याचाच भाग म्हणून जळकोट ता.तळजापुर येथे संविधान दिन आनंदी वातावरणात साजरा करून एका नव दापंत्याचा विवाह संपन्न करण्यात आला.

प्रारंभी मुख्याध्यापक बालाजी गायकवाड, दिलीप कांबळे, शाम बागवे, संभाजी शिंदे यांच्या हस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर व भारतीय संविधानाचे पुजन करण्यात आले. याप्रसंगी शालेय विद्यार्थीनी असावरी लोखंडे व सानिका माने यांनी संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन केले. त्यांच्या समवेत उपस्थित जनसमुदायांनीही सामुदायिकरित्या संविधानाच्या प्रास्ताविकेचे पठण केले. असाप्रकारे संविधान दिन साजरा करून राम व ऐश्वर्या या नवदापंत्याचा विवाह सोहळा बौध्द धम्म पध्दतीने संपन्न करण्यात आला. या सर्व कार्यक्रमाचे प्रास्ताविक एस.के.गायकवाड यांनी केले. तर सुत्रसंचालन अरूण लोखंडे यांनी केले.

यावेळी जेष्ठ कार्यकर्ते मल्हारी लोखंडे,आभिमन्यु कोळी, मनोज लोखंडे, माजी सैनिक अंकुश लोखंडे, सुनिल माने,वामन लोखंडे, प्रदीप लोखंडे, मकरंद सोनकांबळे, बब्रुवान सोनकांबळे, शिवाजी लोखंडे, सुरज लोखंडे, ळआदेश लोखंडे, संजय गायकवाड, आजित पासोडे,आशितोष भालेराव, अशोक भालेराव, प्रविण गायकवाड, बेभीशन लोखंडे,प्रकाश लोखंडे, महिला कार्यकर्त्या छायाबाई लोखंडे, वनिता लोखंडे, सोनम भालेराव, माजी सरपंच ज्योती लोखंडे,कोमल माने सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top