तुळजापूर, दि. 06 : कोविड-19 संसर्गाच्या अनुशंगाने जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, उस्मानाबाद यांनी विविध मनाई आदेश जारी केले आहेत. असे असतानाही ते मनाई आदेश झुगारुन  विशाल विजयराव रोचकरी, आचार्य तुषार भोसले, आनंद दादा कंदले, सचिन रोचकरी, विनोद गंगणे, इंद्रजित साळुंखे, अविनाश गंगणे, नितीन काळे, संतोष बोबडे, सर्व रा. तुळजापूर अशा सर्वांनी अन्य लोकांना एकत्र जमवून दि. 05.11.2020 रोजी 09.00 ते 7.00 वाजण्याच्या कालावधीत तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदीरासमोर नियमबाह्य आंदोलन केले.

यावरुन तुळजापूर पोलीस ठाण्याचे सपोनि सुशीलकुमार चव्हाण यांनी सरकार तर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद 9 व्यक्तींविरुध्द भा.दं.सं. कलम- 188, 269, 270 सह आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम- 51 (ब) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

 
Top